अशा महिला की ज्यांच्याकडे सुंदर आकर्षक वस्तू बनविण्याची कला आहे तसेच रांगोळी, मेहेंदी, साहित्य, कला कथा कविता, गायन अशा विविध कलागुण आहेत अशा सर्व महिलांसाठी हा ग्रुप खुला आहे, त्यामध्ये आम्ही कोणतीही जात धर्म , क्लास पाहिला जात नाही. ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही फी घेतली जात नाही.
ज्या महिला ग्रुपमध्ये सामील होतात त्यांच्यासाठी विविध पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत.
ज्यांना मार्केटिंग जमत नाही / वेळ मिळत नाही, अथवा कोणाला ट्रेनिंग हवे असल्यास , कोणाला whatsapp , fb सुध्दा वापरता येत नाही, तसेच ऑनलाईन चे विविध पर्याय अशा सर्वांची माहिती व मदत कलाकौशल्य करत आहे.
आपण महाराष्ट्र मध्ये कोठेही असाल तर घरबसल्या आपल्या कलेला वाव मिळायला हवा, आपली कला इतरांपर्यंत पोहोचायला हवी. त्यासाठी घरीबसून कोणकोणते पर्याय वापरता येतील किंवा कशाची गरज आहे हे कळू शकल्यास त्याप्रमाणे मदत करता येते.
अर्थात आपणही आमच्या संपर्कात राहणे , विविध विषयावर चर्चा करणे, उपक्रमात भाग घेणे हेही गरजेचं आहे .