मुंबई शहराच्या गजबजाटात, सौ. माधवी देविदास देशपांडे (वय ६०) यांनी आपल्या सर्जनशीलतेला एक शांत आणि सुंदर वाट करून दिली आहे. कला आणि व्यवसायाच्या या अनोख्या प्रवासात, त्यांनी केवळ स्वतःची ओळखच निर्माण केली नाही, तर 'आकृती' या आपल्या ब्रँडच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे सौंदर्य मोत्यांच्या रूपात जतन करण्याचे एक महत्त्वपूर्ण कार्य सुरू केले आहे.
सौ. माधवी देशपांडे यांनी १० वर्षांपूर्वी 'आकृती'च्या माध्यमातून मोत्यांच्या कलाकृती आणि थीम-बेस्ड बाहुल्यांच्या सेटचा (उदा. मौंजीबंधन, पाळणा इत्यादी) व्यवसाय सुरू केला. नवीन काहीतरी शिकण्याच्या तीव्र ओढीने त्यांनी या कलेला आत्मसात केले. औपचारिक प्रशिक्षणाऐवजी, यूट्यूब (YouTube) आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विविध साधनांच्या मदतीने त्यांनी स्वतःला सिद्ध केले. त्यांच्या या प्रवासाला त्यांच्या आईकडून प्रेरणा मिळाली आणि पती, मुले, सुना यांच्या संपूर्ण पाठिंब्याने तो अधिक बळकट झाला. त्यांच्या कलेचे वर्णन 'मोत्यांमधून जपलेली संस्कृती म्हणजेच माझी आकृती' असे करणे अगदी योग्य आहे.
माधवी देशपांडे यांना आपल्या कलेसाठी सर्वाधिक प्रेरणा मिळते ती भारतीय संस्कृती आणि प्रत्येक सण-प्रसंगातून. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे: नव्या पिढीला परंपरागत कलाकृतींची ओळख व्हावी. त्या सांगतात, "वेळेच्या अभावामुळे सणासुदीला परंपरागत रांगोळ्या काढल्या जात नाहीत. अशा प्रसंगी, मोत्यांच्या परंपरागत डिझाईन्स असलेल्या रांगोळ्या पुजेच्या स्थानी ठेवल्यास, केवळ सौंदर्यच वाढत नाही, तर आपली संस्कृती जपण्याचे समाधानही मिळते." आजकाल प्रत्येक कार्यप्रसंग एका इव्हेंटप्रमाणे साजरा केला जातो. अशा वेळी, 'आकृती'ने तयार केलेल्या कलाकृती त्या प्रसंगाची माहिती तर देतातच, सोबतच सोहळा आयोजित केलेल्या व्यक्तीला विशेष आनंद देतात. हेच प्रसंग त्यांना नवीन ऊर्जा देतात.ी असते.
'आकृती'चे अनोखे वैशिष्ट्य, कलेचा प्रसार, सण-उत्सवांची प्रेरणा आणि सांस्कृतिक जतन, आव्हानांवर मात करण्याची कला असा हा त्यांचा कलाप्रवास वाचण्यासाठी कलाकौशल्यच्या दिवाळी अंकामध्ये Amazon Kindle वर उपलब्ध आहे. कलाकौशल्य दिवाळी विशेषांक 2025